Friday, March 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात; ५ म्हशींचा मृत्यू, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 5, 2023
in solapur
0
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात; ५ म्हशींचा मृत्यू, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर:सोलापूर-धुळे महामार्गावर कासेगाव शिवारात भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात पाच म्हशींचा महामार्गावर तडफडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सदगुरु पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक देखील महामार्गाच्या बाजूला जाऊन पलटी झाला आहे. अपघात स्थळी पलटी झालेला मालट्रक आणि रस्त्यावरच पडलेले मुक्या प्राण्यांचे मृतदेह हे विदारक चित्र मन हेलावून टाकणारे होते.पाच म्हशींचा मालक असणारा शेतकऱ्याने घटनास्थळी धाव घेत म्हशींजवळ दुःख व्यक्त करत बसला होता.

म्हशींचा कळप रस्ता ओलांडून जात होता

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी तुळजापूरकडून सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर म्हशींचा कळप रस्ता ओलांडत होता.त्याच मार्गावरून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक ट्रकची म्हशींच्या कळपाला जोरदार धडक लागली. ट्रकची धडक लागून जखमी झालेल्या ०५ म्हशींनी तडफडून जागीच प्राण सोडला. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक देखील पलटी झाला.

शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात देखील अनेक शेतकरी हे दुधाचा व्यवसाय करतात.पाच म्हशींचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता ऐकताच लखन वानकर हे शेतकरी घटनास्थळी धावून आले.दुर्घटना कळताच आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. पाचही म्हशी कासेगाव येथील लखन वानकर या दुग्ध व्यावसायिकाच्या होत्या, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघात स्थळाचा पंचनामा झाल्यावरच नुकसानीचा संभाव्य आकडा पुढे येईल, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Post Views: 152
Previous Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात लोटली भीम सैनिकांची गर्दी…

Next Post

महामानवाला अभिवादन! ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महामानवाला अभिवादन! ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट

महामानवाला अभिवादन! ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट

ताज्या बातम्या

आता सोलापुरात शासकीय महाविद्यालय जूनपासून.#public #marathinews #viral #breakingnews #news

March 6, 2026

विहिरीत पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. #children #marathinews #solapurnews #karamala

March 6, 2026

हिंदू शब्दाचा अर्थ सोयीनुसार लावू नका. #public #viral #marathinews #maharashtranews #aajsolapur

March 6, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार 300 कोटींचे कर्ज. #public #viral #लाडकी_बहीण_योजना

March 6, 2026

‘नवभारत’मध्ये विज्ञान प्रदर्शनाचा उत्साह, करे- पाटील यांच्याकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर

March 6, 2026

तुकाराम महाराज बीज उत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने उत्साहात साजरा

March 6, 2026

श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मोलाचे – माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील

March 6, 2026

ज्ञानाच्या चांगुलपणाची बेरीज व्हावी’ – डॉ. श्रीपाल सबनीस

March 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0717281

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697