रमाई आवास योजनेतील अडचणींबाबत समाजकल्याण उपायुक्त, समाजकल्याणचे सर्व अधिकारी, महानगरपालिकेतील संबंधित सर्व अधिकारी, रमाई आवास योजनेतील लाभार्थी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये महानगरपालिकेची फार मोठी तफावत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ आदेश दिले की रमाई आवास योजनेतील फायनल यादीमधील लाभार्थ्यांना सोमवार पर्यंत आवास योजनेसाठी मंजूर झालेली निधी त्वरीत त्यांना अदा करून त्यांची आवास योजनेची सुरुवात करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेतील यु.सी.डी. विभाग, नगरअभियंता विभाग येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रमाई आवास योजनेकरीता आलेला 23 कोटी निधीचे वितरण झालेले नाही. सदर निधीचे त्वरीत वितरण करून लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ देण्यात यावा असे नाही झाले तर आमदार प्रणिती शिंदे विधानसभेमध्ये हक्कभंगाचा आवाज उठविणार.
सोलापूरात रमाई आवास योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार व हलगर्जीपणा याची चौकशी करण्यात यावी. दोषी अधिका-यांवर कार्यवाही करण्यात यावी असे आदेश आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. तसेच समाजकल्याण उपायुक्त श्री. चौगुले यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील जेवढे लाभार्थी आहेत त्यांची यादी द्या त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देतो व लाभार्थ्यांची घरकूल योजना मार्गी लावतो. सोलापूरातील लाभार्थ्यांना निधीची कमतरता होवू देणार नाही असे सांगितले.

























