अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील रुपम टेक्स्टाईलच्या पहिल्या मजल्यावर पहाटे पाचच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन बिहारी कामगारांचा या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली या खोलीमध्ये एकूण पाच जण होते त्यापैकी दोघेजण सुखरूप बाहेर पडले आगीची घटना कळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन हे आग विझवली आग विझवल्यानंतर या आगीतून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी अधिक माहिती दिली. दरम्यान सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना तिघांच्या जीवावर हा प्रसंग उद्भवला. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी धाव घेतली आणि दहा गाड्यांचा पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणून तिन्ही मृतदेह बाहेर काढले.
या आगीमध्ये कुठलेही मोठे आर्थिक हानी झाली नाही परंतु तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कारखान्याच्या पहिल्या मजल्यावर कामगारांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे या आगीत मृत्यू पावलेले हे तिघेजण बिहार राज्यातील आहेत अंदाजे वय वर्ष 30 ते 35 असे आहे मनोज देहुरी, आनंद बगदी आणि सहदेव बगदी असे मृत पावल्यांचे कामगारांचे नावे आहेत.
दरम्यान रूपम टेक्स्टाईलला आग लागल्यानंतर माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र माने यांनी घटनास्थळी धाव घेतले या आगीच्या संदर्भात त्यांनी अधिक माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यासंदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत.