Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सौंदर्यानं तमाशा रसिकांना घायाळ केलं, टाळ्या अन् शिट्या, आता लावणीसम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 24, 2023
in maharashtra
0
सौंदर्यानं तमाशा रसिकांना घायाळ केलं, टाळ्या अन् शिट्या, आता लावणीसम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ….
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकेकाळची लावणीसम्राज्ञी… जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्या आणि दौलत जादा करत गाजलं. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं. महाराष्ट्राच्या या लावणीसम्राज्ञीवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. शांताबाई अर्जुन लोंढे (रा.कोपरगाव) असे त्यांचे माहेरचे नाव. शांताबाई भटक्या समाजातील असल्याने लहान वयात तमाशात नृत्यकाम करू लागल्या. गायिकाही झाल्या. सौंदर्य, आवाज, नृत्य या तीन गोष्टींवर त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी रसूल पिंजारी वडीतकर, भिका-भीमा सांगवीकर, धोंडू कोंडू सिंधीकर, हरिभाऊ अन्वीकर, शंकरराव खिर्डीकर आदींच्या तमाशात लावणी गाजवली. लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं. शांताबाईंना ना पती, ना कुणी जवळचं. कोंडुराम लोंढे हा भाचा मजुरी करतो. तो थोडंफार लक्ष देतो. कोपरगाव बस स्थानकचं शांताबाईंचं घर. आता शांताबाईंना हवं आहे हक्काचं घर.

बस स्थानकच शांताबाईंच घर

शांताबाई कोपरगावकर या पोटाची खळगी भरण्यासाठी कोपरगाव शहरात भीक मागत फिरत आहेत. लोकही त्यांना मदत करतात. दिवसभर शहरभर फिरून भीक मागून दोन वेळाची जेवणाची व्यवस्था झाल्यानंतर रात्री झोपण्यासाठी हक्काचा निवारा नसल्याने ते कोपरगाव बस स्थानक येथे येऊन झोपतात. जणू कोपरगाव बस स्थानकच शांताबाईंचं घर बनलं आहे.

शांताबाईंवर अशी वेळ का आली?

कोपरगाव येथील काही लोकांनी शांताबाई कोपरगावकर नावाने तमाशा काढला. शांताबाई मालक झाल्या. पन्नास-साठ लोकांचं पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला. बक्कळ पैसा मिळू लागला. पण अशिक्षित शांताबाईंची फसवणूक झाली. तमाशा सुरू करण्यासाठी मदत करणाऱ्यांनीच सर्व तमाशा विकून टाकला. शांताबाई उद्ध्वस्त झाल्या. मानसिक आजारानं ग्रासलं आणि त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या.

एक तमाशा कलावंत म्हणून शांताबाई कोपरगावकर यांना शासनाकडून दर महिन्याला दोन हजार रुपये मानधन मिळत आहे. मात्र या महागाईच्या काळात दोन हजार रुपयात काय होतं? असा प्रश्नही शांताबाई यांनी उपस्थित केला. एक हक्काचं घर आणि शासनाकडून वाढीव मानधन मिळावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘शांताबाईंची अशी अवस्था पाहून वाईट वाटलं’

शांताबाई कोपरगावकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आम्ही तो व्हिडिओ पाहून शांताबाईंचा शोध घेतला. एक कालाप्रेमी म्हणून एका तमाशा कलावंतांचे अशा प्रकारचे हाल पाहून आम्हाला वाईट वाटलं. मग आम्ही त्यांना आमच्या गाडीत बसवून त्यांच्या भाच्याकडे नेलं. तिथे त्यांचे कपडे वगैरे बदलण्यास सांगितले. नंतर शिर्डी येथील रुग्णालयात नेलं आणि त्यांच्यावर उपचार केले. आता शांताबाईंना गरज आहे ती स्वतःच्या हक्काच्या घराची. त्यासाठी त्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा.

शांताबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग सुरू झाला शांताबाईचा शोध. माझी व माझ्या मित्रांची नजर शांताबाईला कोपरगावत शोधू लागली. अखेर शांताबाई कोपरगावच्या विघ्नेश्वर चौकात आढळून आल्या. त्यांना बघताच क्षणी मला खूप आनंद झाला आणि वाईटही वाटलं. एकेकाळी तमाशाचा रंगमंच गाजवणारी ही बाई आज अशा वाईट अवस्थेत जगते आहे. मी घाबरतच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. कारण मला अनेकांनी सांगितलं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ती खूप घाण घाण शिव्या देते. परंतु दोन तासांच्या आमच्या मुलाखतीत तिने एकही शब्द वाईट उच्चारला नाही. उलट तिने आम्हास अनेक लावण्या, लोकगीते, हिंदी गीते ऐकवली.

Post Views: 130
Previous Post

लहान असतानाच ठरवलं, जिद्द अन् मेहनतीने स्वप्न पूर्ण, १९व्या वर्षीच क्रिशा जैन बनली पायलट….

Next Post

प्रसंगवधान म्हणजे काय ते या बस चालकाकडून शिकायला हवे….. व्हिडिओ -वायरल…!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
प्रसंगवधान म्हणजे काय ते या बस चालकाकडून शिकायला हवे….. व्हिडिओ -वायरल…!

प्रसंगवधान म्हणजे काय ते या बस चालकाकडून शिकायला हवे..... व्हिडिओ -वायरल...!

ताज्या बातम्या

संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत यश

March 1, 2026

तातडीने बससेवा सुरू करण्यासाठी थेट परिवहन मंत्र्यांकडे मागणी

March 1, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज

March 1, 2026

ओंकार कारखान्याचा गाळप हंगाम सांगता समारंभ

March 1, 2026

मावा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार

March 1, 2026

शहर पोलिसांची अनधिकृत भोंग्यांवर कारवाई

March 1, 2026

भव्य आणि आधुनिक ‘हाय-टेक’ बसस्थानकाचा मार्ग मोकळा; ३D डिझाईन प्रसिद्ध!

March 1, 2026

इराणच्या शाळेवर इझ्राईलने बॉम्ब टाकला ५१ विद्यार्थी ठार ६० जखमी.#youdh #mission #attck #iran #dubai

March 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710330

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697