सोलापूर होटगी रोडवरील विमानतळाचा प्रश्न गेले काही दिवस प्रलंबित आसून याबाबत रन वेच्या कामाची पाहणी खा. जय सिध्देश्वर महास्वामी आ. विजय देशमुख यांनी केली. गेली अनेक दिवस सोलापूरची विमानसेवा बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे. हीसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. उर्वरित कामाची माहिती घेण्यासाठी विमान प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत खा.डॉ जयसिध्देश्वर महास्वामीजी आमदार विजय देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. पुढील चार ते पाच महिन्यापर्यंत विमान सेवा सुरळीत सुरू करावी याबद्दल आमदार देशमुख यांनी संबधित अधिकारीनां सूचना दिल्या. यावेळी सोलापूर चेबंर आँफ कार्मसचे अध्यक्ष राजु राठी राजशेखर हत्ती यांच्यासह प्राधिकरण विभागाचे अधिकारी, तहसीलदार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















