सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ, सोलापूर संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला, सोलापूर येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेस प्रशालेतील एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संजीवनी पाटील, सतेज जाधव, आकांक्षा घोडके, सरस्वती वंजारी, अनुराधा घोडके, संस्कार खांडेकर, अक्षरा गरडे, सृष्टी कारंडे, भक्ती कदम, गौरी शहापूरकर, तेजस्विनी पाटील, श्रेयस बचुटे, किर्ती कोले, जेनीफर बद्दीपुडी, अभिलाषा ग्यानबोडे, भक्ती डोंगरे, नंदिनी बंडगर आणि जय खळसोडे यांचा समावेश आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेच्या प्रमुख नेहा स्वामी, साधना यादव, अश्विनी भोसले, सुल्ताना मुलाणी आणि साहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे, शालेय समितीचे चेअरमन शिवदास चटके, मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार, उपमुख्याध्यापक श्रीपादराव जगदाळे, पर्यवेक्षक सुरेश जगताप व किरण देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

















