पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल एक किलो (१०८८.३ ग्रॅम) चोवीस कॅरेट सोने जप्त करण्यात आले. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील पाईपमध्ये सोने लपवले होते. पोलिसांना आणि कस्टम विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर तपासणी केल्यानंतर आरोपीच्या सीटखाली हे सोने आढळले.दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी आणि झाडाझडती केली. त्यावेळी वैयक्तिक झडतीत किंवा सामानाच्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे कस्टम विभागही काही काळ गोंधळून गेले होते. नेमके या प्रवाशाने सोने कुठे ठेवले असेल? हा प्रश्न पडला होता.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















