जेऊर – चिखलठाण तालुका करमाळा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्च अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची शंभर टक्के वसुली झाली असून करमाळा तालुक्यातील शंभर टक्के वसुली होणारी पहिली सोसायटी होण्याचा मान या गावच्या सोसायटीला मिळाला आहे याबद्दल सभासद शेतकऱ्यांच्या वतीने अध्यक्ष व संचालक मंडळाचा यांचा सन्मान करण्यात आला
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील अनेक गावच्या सोसायटीच्या कर्ज वाटपातील थकबाकीचे प्रमाण मोठे आहे . यामुळे अनेक सोसायट्या अडचणीत आल्या असून त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्जवाटप धोरणावरही झालेला आढळून येतो. परंतु अद्यापही काही गावाच्या सहकारी सोसायटी यांचे कामकाज चांगल्या पद्धतीचे सुरू असून याचे उत्तम उदाहरण म्हणून करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील विविध कार्यकारी सोसायटीकडे पाहिले जाते. ही तालुक्यातील मोठी सोसायटी असून दरवर्षी या सोसायटीकडून सभासद शेतकऱ्यांना चार कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले जाते. शंभर टक्के वसुलीची परंपरा असलेल्या या सोसायटीची चालू आर्थिक यावर्षातील मार्च अखेरपर्यंत देय असलेल्या सर्व कर्जाचे वसुली झाली असून यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या वतीने व संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष विकास गलांडे व शाखाधिकारी सर्व संचालक मंडळ यांचा सन्मान करण्यात आला. पारदर्शक कारभार व सभासदांचा विश्वास जपण्याचे काम केल्यामुळे वसुलीला अडचणी येत नाहीत दरवर्षी शंभर टक्के वसुली केली जाते असे अध्यक्ष गलांडे यांनी सांगितले
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे मकाई कारखान्याचे संचालक दिनकर सरडे चिखलठाण सोसायटीचे सदस्य बाळासाहेब कोकाटे, राहुल गोळे सतिश बनसोडे यांच्यासह सोसायटीचे संचालक व सभासद शेतकरी उपस्थित होते.


























