माढा – बुधवारी दहावी बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर होता पेपर सुटल्यानंतर माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात पाचवी ते दहावीपर्यंत एकत्र असलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणी पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याने एवढ्या वर्षाची मैत्रीत काहीसा खंड पडणार असल्याने आपल्या जिवलग
मैत्रीची आठवण जोपासण्यासाठी प्रशालेतील मुलींनी एकमेकींच्या गणवेशावर आपल्या शिक्षक व जिवलग मैत्रिणीच्या सह्या घेऊन त्यांची आठवण कायमस्वरूपी जवळ ठेवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
इयत्ता दहावी नंतर खर पाहता हा शालेय जीवनातील आपल्या शिक्षक व जिवलग मित्र-मैत्रिणीपासून वेगळे जाण्याचा भावनिक क्षण आहे. कारण दहावी नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वेगवेगळे मार्ग असतात. त्यामुळे एवढ्या वर्षाची मैत्री काहीशी दुरावते. दहावीच्या लास्ट पेपरचा दिवस हा सर्वांसाठीच भावनिक क्षण असतो.
आपल्या प्रशालेत आपण पुन्हा विद्यार्थी म्हणून जाणार नसतो याच दुःख प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर असत तेच चित्र लास्टच्या पेपरला माढा प्रशालेत दिसून आल प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ती भावना होती. जड अंतकरणाने पेपर झाल्यानंतर प्रशालेतून बाहेर पडणे त्यांना खूप वेदनादायी होत. त्या गोष्टीतून सावरत त्यांनी शिक्षक व आपल्या जिवलग मित्रांशी काहीसा संवाद साधला.
शालेय जीवनात निर्मळ मैत्रीच नात निर्माण झालेले असते त्यापासून काहीसा दुरावा निर्माण होणारी गोष्ट खूप दुःख देणारी असते परंतु आपल्या जीवनात पुढील शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होण्यासाठी ह्या गोष्टी मनात दडवून पुढील जीवन मार्गक्रमण करणे गरजेचे असते. विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रशालेचा निरोप घेताना भावना दाटून आल्या होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापक नागेश खेडकर, शिक्षक किरण भांगे, सुरेखा सदावर्ते, राजेंद्र दराडे, किरण शेलार, अजितसिंह रोंगे, दशरथ वसेकर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.






















