Day: January 21, 2026

सोशलमध्ये प्रथम वर्ष कला-हिंदी अभ्यासक्रमावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तसेच सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कलाचे दोन सत्रात नव्याने पुनर्रचित हिंदी अभ्यासक्रमावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ महाविद्यालयात करण्यात आले होते.   कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. इ.जा. तांबोळी होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद प्रा. डॉ. गंगाधर बिराजदार यांनी भूषविले. या सत्रात प्रा. डॉ. गिरीश काशीद यांनी विषय विश्लेषण केले. प्रा. डॉ. सुचिता गायकवाड यांनी “आधुनिक हिंदी काव्य एवं व्याकरण” या विषयावर तर प्रा. डॉ. किशोर पवार यांनी “आधुनिक हिंदी कहानी एवं व्याकरण” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दुपारनंतर झालेल्या दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दादासाहेब खांडकर होते. या सत्रात प्रा. डॉ. देवराज मुंडे यांनी विषय विश्लेषण केले. प्रा. डॉ. सतीश घारपडे यांनी “हिंदी साहित्य एवं व्यवहारिक हिंदी तसेच प्रयोजनमूलक हिंदी” या विषयावर तर प्रा. डॉ. विठ्ठल वाघमारे यांनी “रोजगारपरक हिंदी, साक्षात्कार व पटकथा” या विषयावर सखोल विवेचन केले. समारोप समारंभास प्रा. डॉ. नवनाथ जगताप तसेच प्रा डॉ. सिद्धाराम पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समारोपाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ.‌अनिल साळूंके यांनी भूषविले. या कार्यशाळेमुळे प्रथम कलाच्या नव्या हिंदी अभ्यासक्रमाची सखोल माहिती प्राध्यापकांना मिळाली असून अध्यापन प्रक्रियेला निश्चितच दिशा मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील हिंदी विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगिता यादव तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. रईसा मिर्झा यांनी केले.

Read more

राष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये एसपी.स्कूलने २१ सुवर्ण,२४ सिल्वर,१७ ब्राँझपदके प्राप्त

करकंब : एडूहील फाउंडेशन(इएचएफ)नवी दिल्ली यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या गणित,विज्ञान व इंग्रजी विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये एसपी.स्कूल नांदोरे तालुका पंढरपूरच्या ...

Read more

लोककल्याणातून आर्थिक समतोल साधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक विकासाचा प्रेरणास्त्रोत

सोलापूर : संपूर्ण जीवनात वैयक्तिक संपत्तीचा उपयोग लोकविकासासाठी करून आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे हेच ध्येय : खा. शिंदे 

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  खा. प्रणिती शिंदे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह नेतेमंडळी यांच्या...

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...