सोयगाव – जगदगुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने दि.१६ शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या महारक्तदान शिबिरात २७५ पुरुष व १५ महिला अशा २९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत प रक्त संकलनाचे काम सुरू होते.दरम्यान सकाळी आठ वाजता जगदगुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूचन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री.स्वामी समर्थ पतसंस्था अध्यक्ष ॲड.राजेश गिरी यांच्याहस्ते करण्यात आले.
सकाळी नऊ वाजेपासून रक्त संकलनास सुरुवात करण्यात आली.रात्री साडे नऊ वाजेपर्यंत रक्त संकलन करण्यात आले.या महा रक्तदान शिबिरात २९० रक्तदात्यांनी रक्तदान केले.रेड प्लस रक्त पेढी जळगाव येथील डॉ.अमोल शेलार,डॉ.रवींद्र पाटील, टेक्निशियन दिपक पाटील, वैष्णवी ठाकूर, मोहिनी जुमडे, अमोल सोये, शाहिद शेख,राजेश बारेला, बादल बारेला व नूरजहाँ तडवी यांनी रक्त संकलनाचे काम केले. श्रीगुरूदेव सेवा संप्रदाय समिती सोयगाव तालुका यांनी महारक्तदान शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. श्रीगुरुदेव सेवा संप्रदाय समिती सोयगाव यांनी महा रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रक्तदात्यांचे आभार मानले.
चौकट:- महा रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी महिला ही सरसावल्या होत्या.शिबिरात पंधरा महिलांनी रक्तदान केले.अमृता योगेश सपकाळ या महिलेने चौथे वेळेस रक्तदान केल्याने महिलांसह रक्तदात्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सोबत फोटो –

























