अक्कलकोट – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गट व पंचायत समितीचे १२ गण याकरिता ७ फेब्रु रोजी सकळी ७.३० वा मतदानास प्रारंभ होणार आहे २९० मतदान केंद्रे याकरिता सज्ज आहेत . पात्र मतदारांनी आपआपल्या मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावावा लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहन पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार विनायक मगर यांनी केले आहे .
अक्कलकोट तालुक्यात जिप व पसं निवडणुक करिता शुक्रवारी तहसिल कार्यालय येथुन प्रत्येक मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी निवडणुक साहित्य मतदान यंत्र सह एस टी बस व जीपने रवाना झाली .
पंचायत समिती १२ गण व जिल्हा परिषद सहा गटात एकूण दोन लाख ३० हजार ९२९ मतदार मतदानासाठी पात्र आहेत . यामध्ये १ लाख १९ हजार १०३ पुरुष मतदार व एक लाख ११ हजार ८० ६ स्त्री मतदार आहेत . २९० मतदान केंद्रे आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार विनायक मगर यांनी दिली .























