अक्कलकोट – दुधनी च्या सर्वागिण विकासा करिता सोलापुर जिल्हयातील शिंदे सेनेचे जेष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली दुधनी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन दुधनीच्या सर्वागिण विकासाकरिता निवेदन सादर केले . दुधनीच्या विकासाकरिता ३०० कोटीचा प्रस्ताव असून प्रारंभी १०० कोटीच्या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे . अशी माहिती शिंदे सेनेचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते तथा दुधनी नगरपालिकेत शिंदे सेने च्या विजयाचे शिल्पकार ठरलेले शंकर म्हेत्रे यांनी दिली .
माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे शिंदे सेनेत जुन मध्ये प्रवेश केला अवघ्या चारच महिन्यात शिंदे सेनेची भक्कम पक्ष बांधणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे . दुधनी नगर पालिकेत नगराध्यक्ष निवडुन आणलाच . शिवाय सर्व नगरसेवक शिंदे सेनेचे निवडुन आणले दुधनी मध्ये भाजपाला एकही नगरसेवक निवडुन आणता आला नाही . अक्कलकोट मध्ये शिंदे सेने चा एक नगरसेवक विजयी झाला . अक्कलकोट नगर पालिकेत दोन नंबरची मते शिंदे सेनेला मिळाली आहेत . शिंदे सेनेत प्रवेश केल्या नंतर अवघ्या ४ महिन्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदे सेनेची भक्कम बांधणी करून अक्कलकोट तालुक्यात मोठा जनाधार मिळवला आहे अशी माहिती शिंदे सेनेचे जेष्ठ नेते शंकर म्हेत्रे यांनी दिली .
























