माळशिरस : तालुक्यात आज जिल्हा परिषदच्या ९ गटासाठी व पंचायत समितीच्या १८ गणासाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान झाले .माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यशवंतनगर येथे मतदान केले ,आमदार उत्तमराव जानकर यांनी धानोरे जिल्हापरिषद शाळेत ,माजी आमदार राम सातपुते यांनी भांबूर्डी जि.प.शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले . ,
आज सकाळी साडेसात वाजता तालुक्यातील ३६३ मतदान केंद्रावर मतदान सुरु झाले .सकाळी साडेनऊ वाजे पर्यंत ६.५१ टक्के साडे अकरा पर्यंत १९.४४ टक्के,दुपारी दिड वाजेपर्यंत ३३.९१ टक्के.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४ ८ . ५० टक्के , .सर्वात जास्त मतदान संग्रामनगर गटात तर सर्वात कमी वेळापूर गरात मतदान झाले.यामध्ये ८ १९७१ पुरुषांनी तर ७२ ३९८ स्त्रियांनी व इतर ५ असे एकूण १५४ ३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
दुपारी साडेतीन पर्यंत गटनिहाय झालेले मतदान दहिगाव ५१ . १३ टक्के ,मांडवे ५१ . ४३ टक्के ,फोंडशिरस ४५ .१५ टक्के,संग्रामनगर ५३ . २१ टक्के ,माळीनगर ४६ .०४ टक्के ,बोरगाव ४३ .२० टक्के,वेळापूर ४१ . ५१ टक्के,निमगाव ५१ . १८ टक्के,पिलीव ४४ . ५० टक्के मतदान झाले.
माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी यशवंतनगर येथे ,संस्कृती सातपुते यांनी भांबूर्डी येथे ,विमल जानकर यांनी वेळापूर मतदान केंद्रावर ,वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी यशवंतनगर येथे ठिकाणी मतदान केले.मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली .मतदान साहित्य जमा करून घेण्याचे काम उशीर पर्यंत सुरु होते .
मतमोजणी अशी केली जाणार
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि ९ रोजी शासकीय धान्य गोडाऊन माळशिरस याठिकाणी होणार आहे. एकावेळी एका गटाची व त्या गटातील दोन गणाची व टपाली मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे.हि मत मोजणी एकूण २४ टेबलावर करण्यात येणार असून प्रत्येक टेबल साठी एक सुपरवायझर ,दोन सहाय्यक,एक शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.टपाली मतदानासाठी प्रत्येक गटाला एक ,दोन गणना दोन असे स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. संगणक, सिलिंग ,रिपोर्टिंग यासह मतदान प्रक्रीयेसाठी एकूण २०१ कर्मचारी याची नेमणूक करण्यात आली आहे.
















