सोलापूर – शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीवर दी. १६ ते २८ जानेवारी २०२६ मध्ये केलेल्या धडक कारवाईत एकुण ८३ गुन्हे नोंद करण्यात आली असुन ८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत २४,०७५ लि. रसायन, १६२६ ब.लि. हातभट्टी दारु, ३९३ ब. लि. देशी मद्य, १८९ ब.लि. बनावट देशी मद्य, ३६८ ब.लि. विदेशी मधु, ९६४ ब.लि. परराज्यातील विदेशी मद्य, १७००० बनावट बुचे, ८० ब.लि. बिअर, ६२५ लि. ताडी तसेच ०३ चारचाकी वाहन व ०७ दुचाकी वाहनांसह एकुण रूपये ४९ लाख ६७ हजार १०२ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच दि. २५ ते २८ जानेवारी २०२६ या कालवधीमध्ये निरीक्षक पंढरपूर विभाग सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करुन ३४६ ब.लि. बनावट विदेशी मद्य तसेच बनावट बुचे, बनावट लेबले, ईत्यादीसह एकुण रुपये ५ लाख ०३ हजार ८४०/- चा मुद्देमाल जप्त केला असुन एक आरोपीस अटक करण्यात आला आहे, तसेच निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने शहरातील जुना विडी घरकुल परिसरात कारवाई करुन अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे ५६० ब.लि. मद्य एक दुचाकी वाहनासह एकुण रुपये ९ लाख २० हजार १२५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच निरीक्षक भरारी पथक क्र.१ या कार्यालयाने मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथे कारवाई करुन १८९ ब. लि. बनावट देशी मद्यासह एकुण रुपये ८४०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपीस अटक करण्यात आली आहे. अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण ०८ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण २४ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई प्र.उपअधीक्षक जे.एन. पाटील, निरीक्षक आर. एम. चवरे, ओ व्ही घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, आर. एम. कोलते, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















