तीव्र उष्णता आणि उष्णतेशी संबंधित आजारांमुळे हज यात्रेला गेलेल्या ५६२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ३२० इजिप्तच्या यात्रेकरूंचा झाला आहे तर जॉर्डनच्या ६० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबियाच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
गेल्या वर्षी या यात्रेदरम्यान २ हजाराहून अधिक यात्रेकरूंना उन्हाचा त्रास झाला होता असं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.