देशात मार्च 2024 पासून आतापर्यंत उष्णतेमुळे 60 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती मिळतेय. उष्माघातामुळे 32 आणि संशयित उष्माघातामुळे 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही नोंद 1 मार्चपासून आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या कोटा येथे उष्माघाताने दोन मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात 1 मार्चपासून 16,344 संशयित उष्माघाताची प्रकरणे आढळली असून 22 मे रोजी 486 संशयित उष्माघात प्रकरणांची नोंद झाली आहे. 27 मेपर्यंत मोठी उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.