सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. सरकारची अशी एक योजना आहे ज्यामुळे गर्भवती मातांना आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली आहे.
पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र महिलांना हफ्तांमध्ये 6000 रुपये रक्कम दिली जाते. देशभरात कुपोषण हा विषय गंभीर आहे. कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
सरकार 6000 रुपये मुलांच्या पोषणासाठी व आजारपणासाठी देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय 19 ते 55 वर्ष असायला हवे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. तर बाळ जन्मल्यानंतर 1000 रुपये महिलेच्या खात्यात जमा होतात.
तसेच या योजनेसंदर्भात माहिती हवी असल्यास 7998799804 या हेल्पलाइनवर फोन करु शकता. व
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.