अक्कलकोट – तालुक्यातील दुधनी नगरपरिषद नगरोस्थान महाअभियान अंतर्गत दुधनी नगरपरिषद भुयारी गटार योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देऊन निधी द्यावी अशी मागणी अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी शिवसेना नेते महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या कडे केली.
उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी एकादशी साठी पंढरपूर येथे आले असता माजी मंत्री म्हेत्रे यांनी भेट घेऊन लेखी मागणी केली. यामध्ये दुधनी नगरपरिषद व्दारे नगरोस्थान महाअभियान अंतर्गत दुधनी नगरपरिषद शहरात भुयारी गटार योजना प्रस्तावित असून या योजनेचा प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्यात आला आहे दुधनी नगरपरिषद दुधनी भुयारी गटार योजनेस अंदाजे ६३ कोटी रु. अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता मिळालेली आहे.
तरी आपल्या स्तरावरून या योजनेस प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली. चौकट १) माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे-दुधनी नगरपरिषद दुधनी भुयारी गटार योजनेस अंदाजे ६३ कोटी रु. अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता मिळालेली आहे.
तरी आपल्या स्तरावरून या योजनेस प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आहे. यावेळी महिला संपर्क प्रमुख अनिता माळगे तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील प्रथमेश म्हेत्रे गुरुशांत ढंगे स्वीयसहाय्यक सोमनाथ चिकलंडे आदी उपस्थित होते






















