श्रीपूर – ता . माळशिरस येथील ब्रिमा सागर डिस्टलरीज च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ६८ जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला . कारखान्याचे माजी संचालक यश कोठारी यांच्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
शिबीराचे उद्घाटन विद्यमान संचालक उदयजी कोठारी , उप जिल्हा रुग्णालय अकलुजचे अधिक्षक बापूसाहेब ओव्हाळ , कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ . सुधीर पोकळे , कै . शंकरराव मोहीते पाटील ब्लड बॅन्केचे डॉ . संतोष खडतरे आंतरराष्ट्रीय खेळाडू जयंत खंडागळे , कंपनीचे व्यवस्थापक दिनकर बेंबळकर , उपव्यवस्थापक चंद्रशेखर भागवत , नरेश पाठक , रसायनतज्ञ संतोष डिंगरे , सुरक्षा अधिकारी भागवत पारसे उपस्थित होते .
प्रथम कै . यश कोठारी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यानंतर प्रास्ताविकात वैद्यकीय अधिकारी डॉ . सुधीर पोफळे यांनी ब्रिमा सागर कंपनीच्या वतीने काळाची व रक्ताची गरज ओळखून गेल्या ११ वर्षा पासून रक्तदानाचा उपक्रम राबविला जात आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगितले .
तर बापूसाहेब ओव्हाळ यांनी आज कमी कष्टात पैसे जास्त मिळावेत ही मानसिकता दिसते परंतू या ठीकाणी इथले कामगार कामा बरोबर अमुल्य असणारे रक्तदानही करतात ही उल्लेख उल्लेखनिय बाब असल्याचे सांगितले .
रक्तदान शिबीरा नंतर हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटनही करण्यात आले या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दि. २ फेबु . रोजी होणार आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभियंते प्रसाद अक्कलकोटकर यांनी केले .
ब्रिमा सागरच्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी उदयजी कोणारी , दिनकर बेंबळकर , डॉ . ओव्हाळ , डॉ पोफळे .

























