पंढरपूर – वै.ह.भ.प. दिगांबर शंकर महामुनी यांचे प्रेरणेने विद्यामान वंशजामार्फत मुळ वास्तव्य स्थानी (जन्मस्थानी) सालाबाद प्रमाणे यंदाही सातशे वर्षाची परंपरा असलेले श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७४० वा समाधी सोहळा (पुण्यतिथी) उत्सव ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री संत नरहरी महाराज मुळ वास्तव्य स्थान विश्वकर्मा निवास, तानाजी चौक, पंढरपूर येथे करण्यात आल्याची माहिती समाधी सोहळा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनकडून देण्यात आली.
श्री संत नरहरी महाराज समाधी सोहळा हा सात दिवस असणार असुन दररोज सकाळी ७ ते ८ श्री नरहरी महाराज मुर्तीस अभिषेक, सकाळी ८ ते ९ विष्णु सहस्त्रनामपाठ, सकाळी ९ ते १० नाममंत्र जप, सकाळी ११ त १२.३० श्री नरहरी महाराज गाथ्यावरील भजन, दुपारी ४ ते ५ हरिपाठ, रात्री ७ ते ९ नामवंत व परंपरागत किर्तन सेवा होतील.तर समाधी दिन बुधवार दि. ०४/२/२०२६ रोजी दुपारी १२.०५ वा. समाधी व पादुकांवर पुष्पवर्षाव होईल. व रात्री नरहरी महाराज जीवन चरित्रावर सुश्राव्य किर्तन होईल.
सर्व कार्यक्रमास सुवर्णकार समाज बांधव, वारकरी, फडकरी, भक्तप्रेमी व संतानुयायी भाविकांनी अवश्य उपस्थित राहुन अक्षर सवेचा लाभ घ्यावा असे संतचरणरज, संयोजक राधिका प्रमोद महामुनी,शंकर प्रमोद महमुनी यांनी कळविले आहे.


























