सांगोला – मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सांगोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८५ गोवंश ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवार दि.१६ मार्च रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सांगोल्यातील भिमनगर येथील गायरान जमिनीवर देशी खिलार गायी, खोंडे, कालवडी व जर्सी कालवडी बांधुन ठेवली आहेत अशी माहिती मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जावुन पुढील कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सांगोला पोलिसांना दिले होते. त्याप्रमाणे सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस स्टाफ यांना सोबत घेवुन भीमनगर, ता.सांगोला येथील गायरान जमीनी असलेल्या ठिकाणी पाळीव प्राणी खिलार गाई, गिर गाई, जर्शी कालवडी यांना चारा पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने चिलारीचे झुडुपामध्ये एकुण ८५ जनावरे अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव बांधुन ठेवलेली रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दिसली. सदर जनावराच्या मालकाबाबत त्यांनी आजुबाजुला चौकशी केली असता काही माहिती मिळुन आली नाही. सदर जनावरे सपोनि.भारत वाघे यांनी जप्ती पंचनाम्याप्रमाणे ताब्यात घेतली आहेत. याबाबत पोहेकॉ.अनिल येडगे यांनी अज्ञात इसमाविरुध्द सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सपोनि.वाघे, पोसई.पुजारी, पाटील, नपोसई.उबाळे, मपोसई.चव्हाण, ग्रे.पोसई.बगाडे, कदम, पोहेकॉ.कोष्टी, वाघमोडे, क्षीरसागर, जाधव, पोना.लेंगरे, वाकीटोळ, पोकॉ.डोबळे, पाटील, वाघमोडे, राऊत, दरदरे, कुंभार तसेच मंगळेवढा पोलीस ठाणेकडील सपोनि.लातुरकर, पोकॉ.सुतार, केरनर, जोजारे, पोहेकॉ.यादव व पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील पोसई.जगताप, पोहेकॉ.बिचुकले, बडे, लोखंडे, सर्जे, मदने, पोना.पकाले यांनी केली.
सदर कारवाई मध्ये ४१ खिलार गायी, ८ खिलार कालवडी, २० खिलार खोंडे, ३ गीर गायी, २ गीर गायीची कालवडी, ७ गीर गायाची खोंडे व ४ जर्शी गायी अशी एकूण ७ लाख ६३ हजार रुपयाची ८५ जनावरे मिळुन आली आहेत.


















