नागरिकांना नव्याने रेशनकार्ड काढण्यासाठी शासनाने ऑनलाइन सेवा दिली आहे. शहरातील पहिले ई रेशन कार्ड वितरित करण्यात आले. क परिमंडळ कार्यालयातून परिमंडळ अधिकारी अनिल गवळी यांच्या हस्ते श्रीपाद मुजगेलकर यांना ई कार्ड देण्यात आले. यावेळी रेशन दुकान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर उपस्थित होते.
केवळ १०० रुपयांत ई रेशन कार्ड देण्यात येत असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. नवीन रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड बनवणे, नावे कमी करणे किंवा वाढवणे यासाठी ई रेशन प्रणाली सुरू आहे. कार्डसाठी आपले सरकारवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाची छाननी होऊन कार्ड ऑनलाइन मिळणार आहे.