उजनीतून पंढरपूर व सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. दोन्ही शहरांसाठी एकाचवेळी पाणी सोडलेले योग्य राहील. या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत आत्ताच निर्णय घेता येणार नसल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, उजनीत सध्या १३ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. सात ते आठ टीएमसी पाणी एका रोटेशनसाठी लागते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. अविनाश हविनाळे यांनी सोलापूर शहर व दक्षिण सोलापूरच्या पाण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या कालव्याचा पर्याय सुचविला.