अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच राकेश निखाडे याला अटक करण्यात आली. तर संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली व जयश्री कडू या तिघी जणी फरार झाल्या असून भंडारा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मात्र 18 विद्यार्थीनींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आताही आंदोलन सुरूच आहे. दरम्यान एका आरोपीला इतर मुख्य आरोपींना अटक न करता भंडारा पोलिसांनी त्यांना विशेष सुट का दिली असा प्रश्न ही उपस्थित होत असून आधीच पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास दिरंगाई झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पोलीस यापुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.