सांगोला तालुक्यातील जनतेने आमदार बदलले, राज्यातील मायबाप जनतेने सरकार बदलले. राज्याची सत्ता चालवण्याची सर्वच प्रमुख पक्षांना संधीही मिळाली. अशा परिस्थितीतही सांगोला तालुक्यातील निवडणुकांमधील पाण्याचा मुद्दा काही बदललेला दिसून येत नाही. गेली अनेक वर्षे निवडणुका आल्या म्हटले, की पाण्याचा मुद्दा समोर येतच होता. आगामी निवडणुकांतही हा मुद्दा पुन्हा चांगलाच गाजणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. यापुढेही पाण्याचा राजकारणातील श्रेयवाद, पाणी पूजनाचे पक्षीय ‘वॉर’ दिसून येतील.तालुक्यात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी विविध नेतेमंडळी आपल्या परीने प्रयत्न करतात. पाणी आल्यास पाणी पूजनाबरोबरच आपण कसे प्रयत्न केले, याबाबत ते जाहीरपणे बोलतात. परंतु, वेळेवर व हक्काचे पाणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची जबाबदारी कोणीच घेत नाही.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...