जेवणानंतर पायी फिरणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून नेत असलेल्या चोरट्याला वेळीच साध्या वेषातील पोलिसांनी पकडले. गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोरील खालसा ढाब्याजवळ ही घटना घडली.
गोंदिया येथील सिंधी कॉलनी येथील वंशिका जितेंद्र कगवानी रा. सिंधी कॉलनी ही आपल्या वहिनीसोबत रात्री जेवण केल्यानंतर पायी फिरत असताना खालसा धाबा समोर एका अनोळखी मोटारसायकल चालकाने विरुद्ध दिशेने जवळ येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढून नेली.
यावेळी वंशिकाने जोरजोराने ओरडल्याने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याला पकडले व झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातून सोन्याची चेन वजन १० ग्रॅम किंमत अंदाजे ६० हजार रुपये जप्त केली. नौमित सोनवाने असे आरोपीचे नाव असुन त्याच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.