सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील दोन सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्या परिषदेतील सदस्यांमधून या दोन सदस्यांची निवड केली जाणार असून त्यामध्ये एक प्राध्यापक व दुसरा सदस्य महिला असेल. त्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी विद्या परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान निवडणूक पार पडेल. त्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक अर्ज सादर करावा लागेल. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी होईल. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.