सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता जय शंकर फेस्टिवल लॉन्स औरंगाबाद रोड येथे काँग्रेस पक्षाची उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा पाटील जिल्हा प्रभारी डॉक्टर राजू वाघमारे सहभारी ब्रिज किशोर दत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पक्ष संघटना तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या कार्यक्रमात बाबत व बूथ यंत्रणा व आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे. या बैठकीला नाशिक शहर व जिल्हा तसेच अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार येथील पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आढावा बैठक होणार आहे. अशी माहिती नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.