राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 13 ऑक्टोबर पासून 3 दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान सरसंघचालक 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील संघ कार्याचा आढावा घेतली. तसेच स्थानिक स्वयंसेवकांशी चर्चा करून राज्यात सुरु असलेल्या विविध कार्यांची माहिती घेणार आहेत. यासोबतच डॉ. मोहन भागवत समन्वय समितीच्या बैठकीचे अध्यक्षपदही भूषवतील आणि कठुआमध्ये स्वयंसेवकांच्या बैठकीला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 2025 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर संघाने देशभर आपल्या कार्यविस्ताराच्या योजना सुरू केल्या आहेत.
या तीन दिवसीय दौऱ्यात सरसंघचालक काश्मिरातील संघ कार्याचा आढावा घेऊन आगामी ध्येयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांनी दिली.