अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला दोन वर्षांपूर्वी अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात अटक झाली होती. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. शिल्पा शेट्टीसाठी हा मोठा धक्का. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल यांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा जवळपास दोन महिने तुरुंगात होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला.
राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एकच चर्चा सुरू झाल्या होत्या. राज बिग बॉसमध्ये दिसणार असं म्हटलं जात होतं. तर त्याच्या आयुष्यावरती सिनेमा येणार असल्याचंही बोललं जात होतं. अखेर ही चर्चा खरी ठरली असून. राज कुंद्रानं त्याच्या त्याच्या अटकेच्या संपूर्ण घटनेवर सिनेमाच बनवलाय. इतकंच नाही तर त्यानं स्व:ता अभिनय देखील केलाय. शिल्पानं नुकताच या सिनेमाचा ट्रेलर शेअर केलाय.
या ट्रेलरमध्ये राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात गेल्याचं पाहायला मिळतं. तर विषय गंभीर असला तरी राजनं याला कॉमेडीचा तडका दिल्याचं पाहायला मिळतंय. UT 69 असं या सिनेमाचं नाव आहे.
राज कुंद्रा यानं २०१९ मध्ये ‘हॉटशॉट्स’ हे त्याचं अॅप लंडन येथील केनरिन प्रायव्हेट लिमिटेट कंपनीला विकलं होतं. ही कंपनी राजचा मेहुणा प्रदीप बक्शी याची आहे. राज याच कंपनीद्वारे त्याचा अॅडल्ट सिनेमे बनवायचा. केवळ इतकंच नाही तर त्यानं गुगल आणि अॅपल प्ले स्टोअरमधून ‘हॉटशॉट्स’ अॅप हटवल्यामुळं होणारी कमाई पुन्हा सुरू करण्यासाठी ‘बॉलिफेम’ नावाचं अॅप तयार करण्याची सुरुवात केली होती. हे अॅप मॉडेलचे अॅडल्ड व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी तयार केलं जाणार होतं. त्यापूर्वी एका मॉडेलनं राज कुंद्रावर आरोप केले आणि हे प्रकरण समोर आलं. पण राज शेवटपर्यंत मी पॉर्न फिल्म नव्हे तर बोल्ड फिल्म बनल्याचं सांगत होता. दरम्यान, राज आता स्टॅंडअप कॉमेडी करतानाही दिसतोय.