स्वत:च्या मालकीची आणि विशेष करुन स्वत:च्या मेहनतीच्या पैशांतून घेतलेल्या गोष्टीचं मोल काही वेगळंच असतं, तो अनुभव मन सुखावणारा असतो. स्वत:ची गाडी घेणं, घर घेणं ही स्वप्नं प्रत्येकाचीच असतात आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण जास्त मेहनत घेत असतो. आपली पण स्वत:च्या कष्टातून घेतलेली गाडी असावी हे एका मराठी कलाकाराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि तो अभिनेता म्हणजे निखिल वैरागर. गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जिद्दीला ”तू फक्त हो म्हण” असं म्हटलं आणि त्याने गेली अनेक वर्षे मनापासून मेहनत घेतली आणि आता त्याच्या स्व कमाईतून घेतलेली टाटा हॅरियर कार त्याच्या दारात आलिशानपणे उभी आहे आणि त्याला त्याचा अभिमान वाटतच आहे पण त्याच्या कुटुंबांना, मित्रमंडळींना देखील त्याचं खूप कौतुक वाटत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...