संपूर्ण राज्यात सध्या चर्चा सुरू असलेल्या ससून रुग्णालयात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी प्रसिद्ध संस्थाचालक विनय अ-हानाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.विनय अ-हाना याला ईडीने यापूर्वीच अटक केली होती. आता ललित पाटील फरार प्रकरणात त्याला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. तर दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात ललित पाटील या गुन्ह्याचा सुत्रधार असल्याचे समोर आले होते. मात्र त्याला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पसार झाला होता.त्यानंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण राज्यात गाजले. ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावले असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासोबतच या ललितला कोणी-कोणी मदत केली याचा तपासही पोलीस करत होते.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...