गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरातून चिंचगड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अब्दुलटोला गावा जवळ ट्रक च्या धडकेत दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला. रुपालाल चौधरी आणि नीलकंठ मंथाले अशी मृतकांची नावे आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला असून देवरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना करिता देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. माजी आमदार संजय पुराम यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी करिता ट्रक चालकाला अटक करण्याची मागणी केली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...