अक्कलकोट, दक्षिण-उत्तर सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यात शेकडो हेक्टर जमिनी कोरडवाहूच. मोहोळ, पंढरपूर या तालुक्यांमध्येही यंदा जेमतेमच पाऊस झाला. मात्र, हवेतून झालेल्या सॅटेलाईट सर्व्हेत सर्व काही उत्तम असल्याचा रिपोर्ट आला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकही तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला नाही. आता बळीराजाच्या पदरात काही सवलती व सरकारची मदत पडावी, यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू आहे.गतवर्षी अतिवृष्टीच्या संकटाला तोंड देऊन नव्या उमेदीने ‘उद्याचा दिवस माझा येईल’ या आशेने काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाला यंदा पावसाने दगाफटका केला. पावसाच्या आशेवर खरिपाची पेरणी केली, पण पावसाने ओढ दिल्याने बहरलेल्या पिकांनी माना टाकल्या. खरीप वाया गेला, आता रब्बीत काहीतरी हाती लागेल या आशेवरील बळीराजाला पावसाअभावी पेरणी सुद्धा करता आली नाही.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...