स्मार्ट सिटी सोलापूर शहरात बेशिस्त वाहतुकीने नागरिक त्रस्त आहेत. नवीन रस्ते करताना पूर्वीच्या रस्त्याच्या चुकात कोणताही बदल न करता, नवीन रस्ते तयार करण्यात आले. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.शहरात अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या अद्याप सुटल्या नाहीत. अशातच उलट दिशेने वाहन चालविणारे दुचाकीस्वार त्यांच्यासह दुसऱ्याच्या जिवालाही धोका निर्माण करतात. सोलापूर शहरात काही मोक्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडी तर होतेच शिवाय अपघातही होत आहेत. अशातच शहरात रंगभवन ते सातरस्ता चौक, शासकीय विश्रामगृह हा रस्ता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...