महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्मस्थान, बांकेबिहारी आणि द्वारकाधीश मंदिराला सहकुटुंब भेट दिली. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांची भक्ती आणि साधेपणा चाहत्यांनी भावला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम चाहत्यांशी संवाद साधत असतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या क्षणी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या लेकी सोबत आणि पतीसोबत देखील काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्या लेकीने ग्रीन रंगाचा ग्लॅमरस ड्रेस कॅरी केली होता. या सिंपल लुकमध्ये त्या दोघी खूपच सुंदर दिसत होत्या.