मुंबई– महाराष्ट्राचे राजकारण सध्या भलतंच तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपण कसे सरस आहोत हे लोकांच्या मनात बिंबवण्यात व्यस्त आहेत. शिवाय निवडणुकांचे वारे वाहू लागल्यामुळे सुद्धा जो तो जनतेच्या मनात आपलं स्थान पक्क करण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहे.अनेक कलाकार मंडळींनी सुद्धा राजकारणात प्रवेश करून आपल्या प्रसिद्धीचा फायदा या माध्यमातून सुद्धा घेतला. आता निवडणूक जवळ आल्यापासून हे कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांच्या मनात राजकीय स्थान निर्माण करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत.
View this post on Instagram
अमोल कोल्हेंचा लालपरीने प्रवास, ग्रामस्थांशी संवाद अन् अडचणी समजून घेतल्या, चिमुकल्यांसोबत सेल्फी! असेच एक अभिनेते व राजकीय नेते म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. आपल्या ऐतिहासिक भूमिकांमधून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. शिवाय गेली कित्येक वर्षे ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. आता अमोल कोल्हे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी व जनतेशी संवाद साधतात. त्यांना आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य संबंधीची माहिती देतात. सोबतच काही ऐतिहासिक गोष्टी सुद्धा सांगतात. आता नुकताच त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे लाल एसटी मधून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. एसटीमध्ये त्यांनी प्रवाशांसोबत संवाद देखील साधला व त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढले. आपल्या एसटीत एक नामवंत कलाकार आलेले पाहून प्रवासी सुद्धा खुश झाले होते.