घरगुती गॅसचा स्फोट होवून एकाच घरातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या गावी घडली आहे. सोनाली बबुरे, वय वर्ष 28 आरुषी बबुरे, वय वर्ष 3, मलिका सिद्ध बबुरे वय वर्ष 1, आणि शावर सिद्ध बबुरे वय वर्ष 70 असे या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत सदरची घटना ही पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घरातील गॅस चालू करण्याकरिता गेले असता अचानक गॅसचा स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे. घटनेतील जखमींना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















