सोलापूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. सोलापुरातल्या जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली. सलाम दलाल असे 35 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभार वेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालंय. दरम्यान मृत सलाम दलाल याला एकूण 3 मुलं असून अवघ्या 3 महिन्याचा बाळ आहे तर 5 आणि 3 वर्षाचे दोन मुलं ही अनाथ झाली आहेत. आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचा ही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...