सोलापूरला अन्न उत्कृष्टता केंद्र जाहीर करण्यात आले होते. यात सोलापूर जिल्ह्यात शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण केंद्र नसल्याने ३ कोटी ९० लाखाचे प्रशिक्षण केंद्र बारामती येथे होत आहे. मात्र मूळ प्रकल्प सोलापूरातच असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पत्रकारांना दिली राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूरात मिलेट प्रकल्प उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या उभारण्यासाठी हैदराबाद येथील आयएमएआर या संस्थेची निवड करण्यात आली आहे. सोलापूरात शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य अशी प्रशिक्षण संस्था नसल्याचा अहवाल याकंपनीकडून राज्य शासनास सादर करण्यात आला होता. त्यामुळे राज्य शासनाकडून केवळ शेतकरी प्रशिक्षणाचा प्रकल्प बारामती येथे करण्याचा २४ नोव्हेबर रोजी शासन परिपत्रकात नमूद करण्यात आला आहे. सोलापूरात शेतकर्यांना प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी सोलापूरातील प्रशिक्षण संस्थांचीही नव्याने शोध मोहिम घेण्यात येत आहे. मूळ प्रकल्पाच्या उभारणीपुर्वी ३० कोटी रुपयांच्या निधीतून सुरुवातील आवश्यक सुविधाही मिलेट प्रकल्पात उभारण्यात येत असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. दरम्यान सोलापूरच्या भाजप नेत्यांनी वेगवेगळ्या खुलासा करून सोलापूरच्या नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम केले आहे. तरी यावर तात्काळ सोलापूर जिल्हा प्रशासनाने यावर उत्कृष्टता केंद्राबाबत योग्य तो खुलासा करून तात्काळ सोलापूरच्या शेतकऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येत होती.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...