स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या प्रियांक खरगे यांच्या विरोधात कन्ना चौक येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने सदरचे आंदोलन घेण्यात आले यावेळी माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका खरगे यांच्या फोटोला जोडे मारत तिरडी यात्रा काढून तिरडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतु पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीमध्ये तिरडी काढून घेण्यात आल्यानंतर केवळ बॅनर जाळण्यात आला. दरम्यान याबाबत माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी काँग्रेसवर निशाणा साधला तर शिवसेना ठाकरे गटाला देखील फैलावर घेत एकीकडे सावरकर प्रेम दाखवायचे आणि दुसरीकडे असे वक्तव्य करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे हे योग्य आहे का सवाल ठाकरेंच्या समोर उपस्थित केला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.