सोलापूरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झाल्याचे सांगण्यात आले. नियोजित कार्यक्रमांसाठी संजय राऊत हे रविवार 10 डिसेंबर रोजी दिवसभर सोलापूर दौऱ्यावर होते. त्याचपार्श्वभूमीवर सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असेलल्या बाळे या गावात संजय राऊत एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी सोलापूर शहराच्या दिशेने जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलेची पिशवी फेकण्यात आली. पुलावरुन एका अज्ञात कार्यकर्त्याने ही पिशवी राऊतांच्या गाडीवर फेकली.यावेळी हे कार्यकर्ते नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान राणे कुटुंबियांवर राऊतानी टीकेची झोड उठवत असतात. त्यामुळे त्यातून हे कृत्य केल्याची यावेळी सांगण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...