सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टीक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात यात्रे निमित्त जय्यत तयारी सुरू असलेली दिसत आहे. श्रींच्या गाभाऱ्यात सुवर्ण सिद्धेश्वर अंतर्गत चांदीचे खांब बसविण्यात येणार असून त्याच चांदीच्या खांबाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. इतर राज्यातील आलेले कारागीर हे चांदीचे खांब बनवण्यात व्यस्त असून ते त्या दहा दिवसांमध्ये हे खांब गाभाऱ्यात बसवले जातील असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान सुवर्ण सिद्धेश्वरसह मंदिर परिसरात सभामंडपाचे काम देखील प्रगती पथावर दिसून येत आहे दगडांमध्ये वैविध्यपूर्णपणे केले जात असलेले नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे सदरचे दगडी सभा मंडप देखील लवकरच पूर्ण होईल असेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यासह इतर शहरातील आणि राज्यातील भाविक देखील मंदिरामध्ये श्रींचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी दिवसेंदिवस मंदिरामध्ये वाढत असलेली दिसत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...