एका ३६ वर्षीय महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. कानुबाई अंबादास बंडगर (वय ३६, रा. पाथरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या आई-वडिलांकडे राहत होती. शुक्रवारी दुपारपासून ती घरातून बेपत्ता होती. घरातील सदस्यांनी तिचा शोध घेतला आणि शनिवारी साडेचारच्या सुमारास पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले असताना पाथरी शिवारातील श्रीकांत बंडगर यांच्या शेततळ्यातील पाण्यात या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याचे समजले. सोलापूर तालुका पोलिसांना ही खबर मिळाली असता फौजदार सुनील बनसोडे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह इतरांच्या मदतीने बाहेर काढला. सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सायंकाळी दाखल केला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...