सोलापूर : मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या मंदिरात महिलांनी पहाटेच रुक्मिणी मातेची भोगी पूजा केली यावेळी रुक्मिणी मातेस परंपरेप्रमाणे विधीवत अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी सर्वसामान्य महिला भक्तांना सहभागी होता आले होते. यानंतर महिलांनी रुक्मिणीमातेस सौभाग्याचे लेणे असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या. तसेच एकमेकांना वानवसा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगीच्या परंपरा संपन्न केल्या. यावेळी रुक्मिणी मातेस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















