सध्या सर्वत्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत आहेत. त्यामुळे अनेक रामभक्त अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही दिवसांत हे मंदिर सगळ्या रामभक्तांमना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे.
रामभक्तांसाठी आता पुण्यातून 15 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी निघणार आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत.
एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकतील. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून या ट्रेनच्या माध्यामातून लाखो लोक अयोध्येला जाऊ शकणार :
▪️मुंबई – अयोध्या – मुंबई
▪️नागपूर – अयोध्या – नागपूर
▪️पुणे – अयोध्या – पुणे
▪️वर्धा – अयोध्या – वर्धा
▪️जालना – अयोध्या – जालना
▪️गोवा – 1 आस्था स्पेशल