ठाणे आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर ३ व ४ फेब्रुवारीच्या रात्री (शनिवार व रविवार) ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३० दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर पॉवर ब्लॉक होईल.
मध्य रेल्वे १४० टी रेल्वे क्रेन वापरून ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील मुलुंड स्थानकावरील जुने पादचारी पूल (एफओबी) काढून टाकण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. यापार्श्वभूमीवर खोपोली केपी १७ साठी डाउन जलद मार्गावरील उपनगरीय ट्रेन विद्याविहार आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. तसेच ब्लॉक कालावधीत खालील उपनगरीय सेवा रद्द राहतील.
त्यासोबतच सीएसटीहून रात्री ९.५४ वाजता सुटणारी कल्याण लोकल आणि ११.५ ला सुटणारी लोकल त्यासोबतच सीएसटी-चेन्नई सुपरफास्ट मेल (गाडी क्र. २२१११५७) , सीएसटी-मडगाव एक्स्प्रेस (गाडी क्र. २०१११) सीएसटी-अमृतसह एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०५७) , दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (ट्रेन क्र. ११०४१) , दादार-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस (गाडी क्र. ११००३) तसेच सीएसटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस (गाडी क्र. २२१७७) या गाड्या पाचव्या मार्गावर वळवण्यात आल्यामुळे १० ते १५ मिनीटे उशिरा धावतील.
त्याचप्रमाणे भुवनेश्वर -सीएसटी कोणार्क एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०२०) हावडा-सीएसटी मेल (गाडी क्र. १२८१०) मंगळुरू- सीएसटी एक्स्प्रेस (गाडी क्र. १२१३४), हैदराबाद-सीएसटी हुसैन सागर एक्स्प्रेस (गाडी क्र. १२७०२) गदग-सीएसटी एक्स्प्रेस (गाडी क्र. १११४०) या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या कल्याण, ठाणे आणि विक्रोळीदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व गाड्या १० ते १५ मिनीटे उशिरा पोहचतील असे रेल्वेने कळवले आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. हिंदुस्थान समाचार