मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकटवटून आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतर ओबीसींचा पहिलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा आज अहमदनगरमध्ये होणार आहे.
अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज दुपारी 3 वाजता हा मेळावा होणार आहे. हा मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.
या महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर , आमदार प्रकाश शेंडगे यांसह अनेक ओबीसी नेत्यांची उपस्थिती असणार आहे.