तुम्हाला आता पॅन कार्डमध्ये नावात बदल करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून पॅन कार्डमध्ये नावात बदल करू शकतात. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
▪️सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल.
▪️त्यानंतर ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करा.
▪️पॅन सेवेच्या अंतर्गत पॅन कार्ड पुनर्मुद्रण/दुरुस्ती/पत्त्यात बदलाची विनंती या टॅबवर क्लिक करा.
▪️त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा हा पर्याय निवडा.
▪️तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि लिंग टाईप करा.
त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
▪️यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल.
▪️काळजीपूर्वक नाव टाईप करा.